रेल्वे पोलीस सतर्क

 wadala
रेल्वे पोलीस सतर्क
रेल्वे पोलीस सतर्क
रेल्वे पोलीस सतर्क
रेल्वे पोलीस सतर्क
See all

वडाळा - पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. या घटनेमुळे विचलित झालेल्या पाकिस्तानकडून स्थानिक स्लिपरसेल मार्फत एखादा मोठा घातपात घडवण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळं वडाळा रेल्वे पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्कता दाखवली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी हार्बर मार्गावरील रेल्वेच्या अतिसंवेदनशील स्थानकावर श्वान पथकाच्या मदतीनं गुरु-तेग बहादूर नगर आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानकावरील अडगळीच्या जागा पिंजून काढल्या. दरम्यान कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही.

Loading Comments