दुचाकी चोर अटकेत

 wadala
दुचाकी चोर अटकेत
दुचाकी चोर अटकेत
See all

वडाळा - एका सराईत दुचाकी चोराला पोलिसांनी पकडल्याची घटना वडाळ्यातल्या आयमॅक्स जंक्शनजवळ घडली. शमसुद्दीन चौधरी (19) असं दुचाकी चोराचं नाव आहे. तो अँटॉप हिलच्या संगमनगरचा रहिवासी आहे. वडाळा पूर्व संगमनगरच्या भाजी गल्लीत राहणाऱ्या हुसेन अन्सारीनं मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणं आपल्या मित्राच्या घराबाहेर दुचाकी उभी केली होती. दरम्यान रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यानं दुचाकी पळवली. मालक हुसेन अन्सारी यांनी वडाळा टीटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून या चोरट्याला अटक केली.

Loading Comments