क्रिकेट खेळण पडलं महागात, पोलिसांनी नोंदवला गुन्हा


क्रिकेट खेळण पडलं महागात, पोलिसांनी नोंदवला गुन्हा
SHARES
देशात सध्या कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलं आहे. त्या पार्श्वभूमिवर मुख्यमंञी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात 144 अंतर्गत जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. संसर्गापासून वाचण्यासाठी हे बंदीचे आदेश दिले असले, तरी अनेक ठिकाणी मुले क्रिकेट खेळताना आढळून आले.दरम्यान साकीनाका पोलिस अशा मुलांवर कारवाई करण्यासाठी गेले असता. त्यांना धक्काबुकी झाल्याची घटना पुढे आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

कोरोना या संसर्ग रोगाच्या पार्श्वभूमिवर राज्यभरात बंदीचे आदेश देण्यात आले आहे. माञ त्याच गैरफायदा घेत, काही मुले क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. साकीनाका पोलिस ठाणे परिसरातील समीता काँम्प्लेक्स, टेलिफोन एक्सचेंजजवळ काही मुल क्रिकेट खेळत असल्याची तक्रार पोलिसांच्या नियंञण कक्षाला आली. त्यानुसार घटनास्थळी साकीनाका पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी मुलांना खेळण्यास बंदी घातली. माञ तरी ही काही जण क्रिकेट खेळण्यावर अडून होती.

 पोलिस आणि रहिवाशांमधील वाद चिघळला. त्यावेळी त्या ठिकाणी राहणाऱ्या महिलांनी पोलिसांना धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. प्रकरण इतक हाताबाहेर गेल की महिलांनी महिला पोलिस शिपायावर हात उगारला. या मारहाणीत महिला पोलिस शिपाई जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी जयश्री राक्षे (32), लता राक्षे(52), लता राक्षेंचा मुलगा आणि एका शेजारी राहणाऱ्या महिलेवर 353, 354, 332, 504,506,34 भा.द.वि कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिस अधिक तपास करत आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा