जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर बस उलटल्याने चार जखमी, एक ठार

  Jogeshwari
  जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर बस उलटल्याने चार जखमी, एक ठार
  मुंबई  -  

  खासगी बस उलटल्याने चार जखमी तर, एकाचा मृत्यू झाल्याची घटना जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर शनिवारी दुपारी दीड वाजता घडली. पवईच्या आयआयटी प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बस बाजूला काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेेत. अपघातामधील जखमींना उपचारासाठी नजिकच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही बस मालाडहून लग्नाचे वऱ्हाडी घेऊन मुंब्र्याला जात होती. यामध्ये एकूण 35 वऱ्हाडी होते. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला आदळली आणि हा अपघात घडला.    

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.