वरळी पोलीस ठाण्यावर मोर्चा

 Lower Parel
वरळी पोलीस ठाण्यावर मोर्चा

वरळीत राहणा-या वैशाली पाटेकर या तरुणीने महिन्याभरापूर्वी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये तिने मृत्यूला जबाबदार असलेल्या सात जणांची नावे लिहली होती. मात्र वरळी पोलिसांनी महिनाभरानंतर देखील आरोपींवर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे रहिवाशांनी वरळी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. दोन वर्षांपूर्वी वैशालीच्या वहिनीनं पाटेकर कुटुंबियांविरोधात हुंडाबळीची तक्रार दाखल केली होती. यामध्ये वैशालीचे देखील नाव होते. यामध्ये तिची मोठी बदनामी झाली होती. त्यामुळे वैशालीनं हे आत्महत्येचे 'टोकाचे पाऊल उचलले होते. 

Loading Comments