98 लाखांची रोकड लंपास करणारे तिघे गजाआड


98 लाखांची रोकड लंपास करणारे तिघे गजाआड
SHARES

वृद्ध व्यापाऱ्याची 98 लाखांची रोकड लंपास करणाऱ्या तीन आरोपींना पकडण्यात पायधुनी पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून आतापर्यंत 60 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मोहम्मद रफीक, मोहम्मद हसन आणि इरफान अहमद, अशी अटक आरोपींची नावे असून ते सर्व पायधुनी आणि डोंगरी परिसरातील रहिवासी आहेत.


अखेर आरोपी अटकेत

तक्रारदार नादीर खान यांचा मणी, मोत्यांचा व्यवसाय आहे. खान यांना फ्लॅट खरेदी करायचा होता. त्याच्या व्यवहारासाठी बुधवारी खान यांनी 98 लाखांची रोकड असलेली बॅग त्यांचे विश्‍वासू कर्मचारी राजेश्‍वर राव शास्त्री यांच्याकडे दिली. आणि ते सिद्धार्थ मेन्शन येथील घरी देण्यास सांगितलं. त्याप्रमाणे राजेश्वर सिद्धार्थ मेन्शन येथील घरी जात असताना एका संशयीताने त्याच्या हातातील पैशांची बॅग खेचून नेली. घटनेनंतर पायधुनी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान सीसीटीव्हीच्या तपासणीत पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला तरुण बॅग घेऊन पळत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांना या तिघांना अटक करण्यात यश आलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा