जपानी महिलेच्या मदतीला धावून आले रेल्वे पोलिस

वडोडरा रेल्वे स्टेशन येथे जाग आली असता, त्यांचे पासपोर्ट ,जपानी चलन ,केमरा , अमेरिकन डॉलर असे ऐकून 34,000/- चे सामान असलेली बँग चोरीला गेल्या बाबत त्यांना समजले

जपानी महिलेच्या मदतीला धावून आले रेल्वे पोलिस
SHARES
मुंबईत जपानहून पर्यटनासाठी आलेल्या जपानी महिलेची हरवलेली बँग रेल्वे पोलिसांनी अवघ्या काही तासात शोधून दिली. या बँगेत महिलेचा पासपोर्ट, पैसे, कँमेरा आणि महत्वाची कागदपञे होती. रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे त्या जपानी दांपत्यांनी आभार मानत पोलिसांचे कौतुक केले.


 जपानी रहिवाशी असलेले मीओशो हज्मी  (40) हे जपानमध्ये  जापनीज रेस्टॉरंट चे मालक आहेत. सध्या ते चायनाच्या बेजिन्ग मध्ये रहावयास असून सपत्नीक भारत दौऱ्यावर आले आहे. 4 फेब्रुवारी रोजी मीओशो हे पत्नी गाओ जिण्ग्षोण (32)  सोबत दिल्ली येथे आल्यावर मुंबई ला येण्यासाठी ते दिल्ली ते मुंबई सेंट्रल राजधानी एक्सप्रेसच्या. चे बोगी क्रमांक 2,सीट no .39,40 वरून प्रवास करत होते. राञा दोघांचाही डोळा लागला. मध्यराञी मीओशो  यांना राञी 11 वा  वडोडरा रेल्वे स्टेशन येथे जाग आली असता,  त्यांचे पासपोर्ट ,जपानी चलन ,केमरा , अमेरिकन डॉलर असे ऐकून 34,000/- चे सामान असलेली बँग चोरीला गेल्या बाबत त्यांना समजले. परंतु त्यांना मुंबई ला जायचे असल्याने ते वडोडरा येथे न उतरता. ते एक्स.मुंबई सेंट्रल येथे आल्यावर त्यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस स्टेशन येथे सदर बाबत माहिती दिली.

     या घटनेची माहिती मिळताच पोलिस कामाला  लागले. परिसरातील सर्व सीसीटिव्ही हाताळून वपोनि श्री.धिवार साहेब यांनी जपानी फिर्यादी यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे तो गुन्हा 00/2020(188/2020), कलम 379भा.द .वी प्रमाणे गुन्हा दाखल करून वडोडरा जी.आर.पी ला पाठवला. चौकशीत पोलीसांनी केलेल्या तपासादरम्यान जपानी फिर्यादी यांच्या  सामानची बॅगेच्या वर्णनाप्रमाणे जामनगर जी .आर.पी .येथे एक बॅग जमा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

 पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता. क जामनगर जी. आर.पी  येथील पो.उप निरीक्षक श्री .फारूक अदनामी यांच्याशी संपर्क साधून बॅगबाबत माहिती देऊन सामान ओळखनेसाठी जपानी फिर्यादी यांचेसह  जामनगर जी. आर.पी  पोलीस स्टेशन येथे गेले . जपानी फिर्यादीने नमूद बॅग व  सामान  पाहून ती त्याचीच असल्याचे  पोलिसांना सांगितले. रेल्वे पोलिसांच्या या कौशल्यपूर्ण तपास आणि तत्परतेचे परदेशी नागरिक जपानी दांपत्यांनी  मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

           
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा