राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पोर्नोग्राफीच्या आरोपांखाली राज कुंद्राला गुन्हे शाखेने २० जुलैला अटक केली आहे. राज कुंद्राविरोधात पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत.

राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
SHARES

अश्लील चित्रपट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचा सहकारी रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. 

दरम्यान, राज कुंद्राचे वकील सुभाष जाधन यांनी राज कुंद्राच्या जामिनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर गुरूवारी सुनावणी होणार आहे. पोर्नोग्राफीच्या आरोपांखाली राज कुंद्राला गुन्हे शाखेने २० जुलैला अटक केली आहे. राज कुंद्राविरोधात पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत. 

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फेब्रुवारी २०२१ मध्ये मढ येथील एका बंगल्यावर छापा टाकून पॉर्न तयार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा तपास लावला होता. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केला असता यामागचा मास्टर माईंड राज कुंद्रा असल्याचं समोर आलं. 

राज कुंद्र आणि शिल्पा शेट्टीच्या बँका खात्यांचीही शाखेने चौकशी केली आहे. राज कुंद्राच्या बँक खात्यांमधून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होत असल्याचं उघड झालं आहे. तर त्याची कानपूरमधील दोन बँक खाती सील करण्यात आली आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा