COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

फ्री-वेवरील अपघातात 14 विद्यार्थी जखमी


फ्री-वेवरील अपघातात 14 विद्यार्थी जखमी
SHARES

मुंबईच्या पूर्व मुक्त मार्गावर टाटा रिसर्चच्या विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या अपघातात टाटाचे 15 ते 16 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद आरसीएफ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


असा घडला अपघात

टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे विद्यार्थी नेहमीप्रमाणे बुधवारी चेंबूर येथील त्यांच्या हॉस्टेलमध्ये परतत होते. त्यावेळी पूर्व मुक्त मार्गावर भरधाव वेगात बस चालवत असलेल्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यावेळी बस पांजरपोळ बोगद्याजवळील दुभाजकाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा अक्षशा चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातात बसमधील 15 ते 16 विद्यार्थी जखमी झाले असून चालकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्वांना उपचाराकरता पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा