रोड रोमियोला तरुणींनी दाखवला हिसका


रोड रोमियोला तरुणींनी दाखवला हिसका
SHARES

रस्त्यावरील तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओला महाविद्यालयीन तरुणींनी चांगलीच अद्दल घडवली आहे. मुलींचा छेड काढणाऱ्या तरुणाला चोप देऊन या तरुणींनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं. अंकुश महाडिक असं या रोड रोमिओचं नाव असून त्याच्या विरोधात माटुंगा पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार

माटुंग्याच्या एसएनडीटी महाविद्यालयाची एक तरुणी बुधवारी माटुंगा स्थानकाहून काॅलेजच्या दिशेने जात होती. त्यावेळी स्थानक परिसरापासून अंकुश तिचा पाठलाग करू लागला. माटुंगा जिमखाना येथील पेट्रोलपंपजवळ तरुणी आली असताना अंकुशने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने त्याकडे दुर्लक्ष केल्यानं अंकुशने तिचा हात पकडत, तिच्याशी जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित मुलगी अंकुशचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिनं कशी बशी स्वत: अंकुशच्या तावडीतून सुटका करून घेतली.


अंकूशला चोपलं

या घडलेल्या प्रकाराबाबत तिनं काॅलेजच्या शिक्षकांना सांगितलं. त्यावेळी इतर विद्यार्थिंनींनीही अंकुशबाबत तक्रार केली. त्यावेळी कॅालेजचे शिक्षक आणि विद्यार्थिनींनी अंकुशचा शोध घेण्यासाठी माटुंगा परिसरात फिरत असताना तो एका चहाच्या टपरीवर चहाचे घोट घेत मोठ मोठ्या गप्पा हाणत बसला होता.

त्या तरुणीची छेड काढल्याबाबत इतर तरुणी जाब विचारू लागले असता अंकुश उडवाउडवीची उत्तरं देऊ लागल्यानंतर विद्यार्थिनींनी त्याला चोप देत पोलिसांना पाचरण केलं. विद्यार्थिनींनी दिलेल्या तक्रारीनुसार माटुंगा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अंकुश याला अटक केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा