अंधेरीतील धक्कादायक प्रकार, हातपाय बांधून रिव्हाल्वरच्या धाकावर व्यावसायिकाच्या घरात दरोडा


अंधेरीतील धक्कादायक प्रकार, हातपाय बांधून रिव्हाल्वरच्या धाकावर व्यावसायिकाच्या घरात दरोडा
SHARES

अंधेरीतील एका व्यावसायिकाच्या घरात चार आरोपींनी रिव्हाॅल्वरच्या धाकावर तब्बल १६ लाखांचा दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. या आरोपींनी पत्नीला रिव्हाँल्वरचा धाक दाखवत बांधून ठेवून ही चोरी केल्याची तक्रार एमआय़डीसी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- वाहतूक पोलिसांच्या गणवेशावर लावले जाणार कॅमेरे

अंधेरी एमआयडीसीच्या रुस्तमजी को. आँप. हौसिंग सोसायटीत इब्राहिम सनाउल्ला चौधरी हे राहतात. रविवारी मध्यरात्री चौधरी  आणि त्याची पत्नी घरी असताना. रात्री १२.३० ते १ च्या सुमारास त्यांच्या घराची बेल वाजली. मध्यरात्री चौधरी यांनी दरवाजा उघडला असता. चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना जोरदार धक्का देत घरात प्रवेश केला. चौधरी यांनी आरडा ओरड करू नये म्हणून आरोपींनी यांच्यावर रिल्हाँल्वर ताणून धरली. ऐवढ्यावरच न थांबता आरोपींनी  दोघांना घरात बांधून ठेवत, घरातील तब्बल १६ लाखांचे मौल्यवान दागिने, मोबाइल, महागडी मनगटी घड्याळ आणि रोखरक्कम घेऊन पळ काढला. या दरम्यान आरोपींनी चौधरी यांना घाबरवण्यासाठी त्यांच्या पत्नीला किरकोळ जखमीही केले. त्यांच्यावर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौधरी यांनी कशीबळी स्वतःची सुटका करून एमआयडीसी पोलिसांना घडलेलाप्रकार सांगून मदत मागितली. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत, चौधरी यांच्या तक्रारीनुसार कलम ३९४, ५०६ (२), ३४, भादवीसह ३, २५ हत्यारबंदी कायद्यांतर्गत चार आरोपींना गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी  एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा