20 लाखाच्या घड्याळाची चोरी

 Kandivali
20 लाखाच्या घड्याळाची चोरी

कांदिवली - कांदिवली परिसरात झालेल्या २० लाखांच्या हिरेजडित सोन्याच्या घड्याळ्याच्या चोरीची केस कांदिवली पोलिसांनी अवघ्या काही तासात सोडवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नारायण सुतार नावाच्या सुतारालाच अटक केली आहे.

ज्या घरात चोरी झाली होती, त्यांच्या घरात फर्निचरचे काम सुरु होते. रविवारी नारायण सुतार हा फर्निचर बनवयला घरी आला, त्याला कपाट उघडे दिसले, काही हाती लागतं का या उद्देशाने नारायण सुतारने हात साफ केला. आणि हिरेजडित सोन्याचं घड्याळ आणि दागिने घेऊन त्याने पळ काढला. विशेष म्हणजे हे घड्याळ एवढं महाग असेल याची त्याला देखील कल्पना नव्हती.

चोरीला गेलेलं घड्याळ तसेच दागिने नारायण सुतारकडून जप्त केल्याचे कांदिवली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सोमवारी कांदिवली पोयसर येथील हिरानंदानी हेरिटेज इमारतीतील व्यंकटेशन यांच्या घरातून २० लाखांचं रोलेक्सचं हिरेजडित सोन्याचं घड्याळ तसेच पाच लाखांचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले होते.

 

 

Loading Comments