स्कूल बस चालकाचा पालकावर जीवघेणा हल्ला


स्कूल बस चालकाचा पालकावर जीवघेणा हल्ला
SHARES

लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि खून या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने शाळा खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. अशात आता पालकांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल असा प्रकार समोर आला आहे.


यामुळे पालक नाराज

बदलापूरमध्ये शाळेच्या बसचालकाने दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारणाऱ्या पालकावर बसचालकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पालकवर्गात अस्वस्थता आणि संताप पसरलाय.

बदलापूर येथे राहणारे मंगेश तारोळे-पाटील यांचा मुलगा लोकेश हा गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता दुसरीत शिकत आहे. बसचालक रवी लवाटे हा लोकशबरोबर अश्लील चाळे करणे तसेच डोळे वटारून धमकी देणे, असे प्रकार करत होता. सातत्याने हा प्रकार घडत असल्याने लोकेशने याबाबत पालकांना सांगितलं. आपल्यासोबत पुन्हा असा प्रकार होईल या भीतीने मुलगा शाळेत जाण्यासाठी घाबरत होता.

शेवटी त्रस्त झालेल्या मंगेश पाटील यांनी याबाबत बसचालकाला जाब विचारला असता बसमधील दुसऱ्या चालकाने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे पाटील यांनी बसचे मालक प्रसाद म्हस्कर यांच्याकडे त्या चालकाची तक्रार केली. बसमालकाकडे तक्रार केल्याने रागावलेल्या बस चालकांनी त्यांना जबर मारहाण करत जीवघेणा हल्ला केला.


बस मालक शिवसेनेचा पदाधिकारी

गंभीररित्या जखमी झालेले मंगेश पाटील यांच्यावर उल्हासनगरमधील सेंट्रल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस मालक हा शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर दबाव टाकला जात आहे, अशी माहिती पाटील कुटुंबियांकडून देण्यात येत आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा