बंदूक लोड करताना सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

  Seepz
  बंदूक लोड करताना सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
  मुंबई  -  

  अंधेरी - बंदुक लोड करताना एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरी परिसरात घडली आहे. राधामोहन सिंह(55) असं या सुरक्षारक्षकाचं नाव असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अवदेश सिंह नावाच्या दुसऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.

  राधामोहन आणि अवदेश सिंह हे एकाच सुरक्षा एजेन्सीमध्ये काम करतात. सकाळी 11 च्या सुमारास सिप्झ येथील कोटक महिंद्राच्या स्ट्राँग रुममध्ये अवदेश सिंह गोळी लोड करत असताना अचानक मिस-फायर झाली आणि गोळी समोर उभ्या असलेल्या राधा मोहन यांच्या पोटातून आरपार गेली. त्यांना तत्काळ जवळच असलेल्या इएसआयसी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. पण तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. सध्या राधामोहन यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अवदेश सिंह याला सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.