लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

 Bandra East
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
See all
Bandra East , Mumbai  -  

वांद्रे - निर्मल नगर येथे राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरासह त्याच्या मित्राला वडाळ्यातील विजयनगर येथून शनिवारी अटक केली असून, प्रियकरावर लैंगिक अत्याचाराचा व त्याच्या मित्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांद्रे येथे राहणाऱ्या सोनी (बदललेले नाव) हिचे वडाळ्यात राहणाऱ्या तरुणाशी गेल्या चार वर्षांपासून प्रेम संबंध होते. याचाच फायदा घेत या नराधमाने लग्नाचे अमिष दाखवून पीडित मुलीसोबत अनेकदा शारिरीक संबंध ठेवले. त्यामुळे पीडित मुलीने या नराधमाकडे लग्नाचा आग्रह धरला. तरुणीचा आग्रह पाहून संतापलेल्या नराधमाने लग्नास नकार देत टाळाटाळ करायला सुरुवात केली. याचाच गैरफायदा घेत प्रियकराच्या मित्राने या पीडित तरुणीशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. त्रस्त झालेल्या या पीडित तरुणीने आपला प्रियकर व त्याच्या मित्राविरोधात निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता. आरोपी वडाळ्यातील विजय नगर परिसरात रहात असल्याने निर्मल नगर पोलिसांनी हा गुन्हा वडाळा टीटी पोलिसांकडे वर्ग केला. घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी विजय नगर परिसरात सापळा रचून मोठ्या शिताफीने या दोघांना अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

Loading Comments