गँगस्टर पुजारीच्या शार्प शुटर्सना अटक


गँगस्टर पुजारीच्या शार्प शुटर्सना अटक
SHARES

चेंबुर - खंडणी विरोधी पथकाने गँगस्टर सुरेश पुजारीच्या पाच शार्प शुटर्सना चेंबुरमधून अटक केली.गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी उल्हासनगरमधील बिल्डर सुमित चक्रवर्ती यांच्या कार्यालयात गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळून पाच पिस्तुलांसह, ३१ जिवंत काडतुसे, ६ मोबाईल आणि ४ मॅग्झीन हस्तगत केले आहेत. खंडणी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स यांनी ही माहिती दिली.
चेंबुरमधील ट्रॉम्बे रोड परिसरात सुरेश पुजारी टोळीचे काही शुटर्स घातक शस्त्रासह येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली, त्यानंतर सापळा रचून हनुमंत गायकवाड (२७), राहुल लोंढे (२४) आणि रवींद्र घारे (३१) या तिघांना अटक करण्यात आली.

पुजारी गॅंगच्या तिन्ही आरोपींच्या कसून चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार घारे याच्या पुण्यातील घरातून ३ जिवंत पिस्तूलांसह काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच पोलीस पथकाने नवी मुंबईतून रोहन डिकोस्टा (३०) आणि इकलाक शेख (३०) या दोघांना शुक्रवारी बेड्या ठोकल्या. या आरोपींनी पुजारीच्या सांगण्यावरूनच ११ जुलै रोजी उल्हासनगरमधील बांधकाम व्यावसायिक सुमित चक्रवर्ती यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता.
आरोपींजवळून आतापर्यत ९ एमएम बोअर तीन पिस्तुले, ७.६५ बोअर दोन पिस्तुले, ३१ जिवंत काडतुस, अतिरिक्त ६ रिकाम्या मॅग्झीन्स, ६ मोबाईल हस्तगत करण्यात आल्या आहेत. घारे आणि शेख हे सुरेश पुजारीचे खास हस्तक आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा