धक्कादायक! ६ महिन्यात ३ हजार अल्पवयीन मुली बेपत्ता


धक्कादायक! ६ महिन्यात ३ हजार अल्पवयीन मुली बेपत्ता
SHARES

एकीकडे महिलांवरील अत्याचारात वाढ होत असतानाच, अाणखी एक धक्कादायक माहिती समोर अाली अाहे. राज्यातून गेल्या ६ महिन्यांच्या कालावधीत जवळपास २९६५ मुली बेपत्ता झाल्या अाहेत. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली अाहे.


गुन्ह्याची नोंद नाही

अकोल्याचे अामदार रणधीर सावरकर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हे प्रकरण उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लिखित स्वरूपात या प्रश्नाला उत्तर दिले. बृहन्मुंबई पोलीस अायुक्तालयात अल्पवयीन मुलांना, तरुणींना भुलवून पऴवून नेणाऱ्या टोळीबाबत कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.गेल्या वर्षीही एवढ्याच मुली गायब

जानेवारी २०१६ ते जून २०१६ या कालावधीत २८८१ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. अाता जानेवारी २०१७ ते जून २०१७ या कालावधीत त्यात वाढ झाली असून २९६५ मुली गायब झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


विशेष अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष स्थापन

राज्यातल्या अल्पवयीन अाणि हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाची स्थापना करण्यात अाली अाहे. बेपत्ता बालकांचा शोध घेण्यासाठी स्थापन केलेल्या 'अाॅपरेशन मुस्कान' अाणि 'स्माईल'अंतर्गत १६१३ बालकांचा शोध घेण्यात अाला. या वर्षी ६४५ बालकांचा शोध लावण्यात संबंधित पथकाला यश अाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा