जैन मंदिरातून कोट्यवधींची चांदी चोरीला

बोरीवली - खुद्द मंदिराच्या ट्रस्टीनेच मंदिरातून कोट्यवधींची चांदी लांबवल्याचा प्रकार बोरीवलीत उघडकीस आलाय. इथल्या संभवनाथ जैन मंदिरात चांदीच्या रथावरील छत गायब झालंय. या प्रकरणी आरोपी महेंद्र जैनविरोधात 1 डिसेंबरला पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मात्र पोलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही.

स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय की, ट्रस्टी महेंद्र याने मालाडमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या मदतीनं चोरीचा प्लॅन करून चांदी लंपास केली. त्या चांदीचं वजन 330 किलो असून त्याची किंमत 1 कोटी 85 लाख रूपयांच्या जवळपास असल्याचं सांगण्यात येतंय.

Loading Comments