दहिसरच्या रेल्वे वसाहतीत स्लॅब कोसळून महिला जखमी


दहिसरच्या रेल्वे वसाहतीत स्लॅब कोसळून महिला जखमी
SHARES

रेल्वे... मुंबईची लाईफलाईन... मात्र, ही लाईलाईन चालवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचं जीवन अत्यंत विदारक आहे. गेली अनेक वर्षे हे कर्मचारी मुंबईतल्या रेल्वे कॉलन्यांमध्ये रहातात. पण जीव मुठीत धरूनच...

एल्फिन्स्टन आणि अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वेने पुरातन वास्तूंकडे लक्ष केंद्रीत केलं असतानाच, दहिसरच्या रेल्वे काॅलनी परिसरात घराचा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाल्याने इमारतीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


रेल्वे कॉलनीत स्लॅब कॉसळला

मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत. या इमारतीत राहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून इमारतीचा देखभाल खर्च आणि भाडे नियमित कापून जाते. मात्र त्या तुलनेत त्यांना सुविधा काही मिळत नाहीत. ४० वर्ष जुन्या मोडकळीला आलेल्या या इमारतीला जागोजागी तडे गेले आहेत. या इमारतींवर मोठी मोठी झाडं उगवलेली असून ठिकठिकाणी स्लॅब पडलेले आहेत, अशीच स्थिती दहिसर येथील रेल्वे कॉलनीची झाली आहे.  


महिला जखमी

दहिसर पूर्वेतील स्थानकाजवळील इमारत क्रमांक २८ मध्ये लांजेकर कुटुंबिय राहतात. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास लांजेकर कुटुंबिय झोपण्यासाठी अंथरूण टाकात असतानाच इमारतीचा स्लॅब गणेशोत्सवानिमित्त माहेरी आलेल्या लांजेकरांच्या मुलीच्या शेजारी पडला. या दुर्घटनेत ती किरकोळ जखमी झाली. मात्र स्लॅब कोसळल्याच्या आवाजामुळे इमारतीतील इतर रहिवाशांनी लांजेकरांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. जीर्ण झालेल्या इमारती पावसाच्या पाण्याने भुसभूशीत झाल्या होत्या. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करूनसुद्धा अद्याप कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रेल्वे कर्मचारी भीतीच्या सावटाखाली रहात आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा