छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून आईची हत्या, मुलाला अटक

विशाल काम करून मिळालेल्या पैशांची उधळपट्टी करत असायचा. तो आईकडे सतत पैशांची मागणी करत होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत होते.

छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून आईची हत्या, मुलाला अटक
SHARES

छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैसे देण्यावरुन झालेल्या वादातून मुलाने हे टोकाचं पाऊल उचललं. मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरातून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. 

 सोमवारी मुंब्य्रातील रेतीबंदर परिसरात ही घटना घडली. विशाल एलझेंडे हा अविवाहित तरूण मुंब्रा येथे आपली आई उर्मिला एलझेंडे हिच्यासोबत राहत होता. विशाल काम करून मिळालेल्या पैशांची उधळपट्टी करत असायचा. तो आईकडे सतत पैशांची मागणी करत होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. 

सोमवारी दुपारी पैशांवरुन दोघांमध्ये वाद झाला. ह्या वादाने टोकाचं स्वरूप काढलं. राग अनावर झाल्याने विशालने स्क्रू ड्रायव्हर आईच्या छातीत खुपसला. विशालने केलेला वार गंभीर होता. त्यामुळे त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला. 

मुंब्रा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विशालला अटक केली आहे. मृत उर्मिला एलझेंडे हिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा