SHARE

गोवंडी - शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही मुलगी स्पेशली एबल्डही आहे. या मुलीवर दोन मामेभावांनीच अत्याचार केल्याच उघड झालंय. सख्या मामाच्या दोन मुलांनी या मुलीवर केलेला अत्याचार ही मुलगी एका सामाजिक संस्थेच्या स्नेहसंमेलनास गेली असता उघडकीस आला. मुलीने या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना ही घटना सांगितली. कार्यकर्त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगून गुन्हा नोंद करवून घेतला आणि दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या