• लिफ्टमध्ये अडकलेल्यांची एक तासानंतर सुटका
SHARE

घाटकोपर - मुक्ताबाई रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकलेल्या रुग्ण आणि लहान मुलांची एक तासानंतर सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, या घटनेतून रुग्णालय कर्मचाऱ्यांची बेफिकीरी आणि मुजोरपणाही स्पष्ट झाला आहे. लिफ्टमध्ये अडकलेल्यांनी आरडाओरडा केल्यानंतरही कुणी कर्मचारी त्यांना सोडवण्यासाठी आला नाही. अर्ध्या तासानंतर तिथे काही कर्मचारी आले आणि त्यांनी अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला. या वेळी लिफ्टमध्ये अडकलेल्यांचा व्हीडिओ काही जण काढत होते, तेव्हा कर्मच्याऱ्यांनी त्यांना अटकाव केला. त्यांचा मोबाइल हिसकावून घेत व्हीडिओ डिलीटही केला. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी या कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता, त्यांच्यावर ओरडून पोलिसांत देण्याची धमकीही या कर्मचाऱ्यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या