पवई आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांची आत्महत्या

मुंबईतील पवई आयआयटीमध्ये एका २६ वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पवई आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांची आत्महत्या
SHARES

मुंबईतील पवई आयआयटीमध्ये एका २६ वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दर्शन रामधन मालवीया असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. दर्शनने हॉस्टेल इमारतीच्या ७व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.

दर्शन रामधन मालवीया मुळचा मध्यप्रदेशच्या इंदोरचा राहणारा आहे. सोमवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास त्यानं उडी मारल्याचं पोलिसांचं म्हणणे असून पवई पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

तणावात त्यानं हे पाऊल उचलल्याचं सुसाइड नोट मध्ये लिहिल्याचं सूत्रांचे म्हणनं आहे. त्याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पवई पोलीस याप्रकरणी अधीक तपास करत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा