न्या. लोया मृत्यू प्रकरण, निष्पक्ष चौकशीच्या मागणीची याचिका फेटाळली


न्या. लोया मृत्यू प्रकरण, निष्पक्ष चौकशीच्या मागणीची याचिका फेटाळली
SHARES

सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी निष्पक्षपणे चौकशी करणारी याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यांचा मृ्त्यू नैसर्गिक असून हा तर न्यायव्यवस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचं न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. त्यामुळे लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची आता निष्पक्ष चौकशी होणार नाही.


कुणी दाखल केली याचिका?

काँग्रेस नेते तहसीन पुनावाला, पत्रकार बंधुराज लोणे, बॉम्बे लॉयर्स असोसिएशनसहीत इतर पक्षकारांनी न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान गुरुवारी मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला.

न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणी काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने संबंधित असलेली दोन प्रकरणं मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग केला होता.


संपूर्ण प्रकरण?

१ डिसेंबर २०१४ रोजी नागपूरमध्ये हृदयक्रिया बंद पडून न्या. लोया यांचा मृत्यू झाला होता. याबाबत रुग्णालयात नोंदही आहे. मृत्यूपूर्वी ते एका खटल्याची सुनावणी करत होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात होता. न्या. लोया यांच्या बहिणीने त्यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थिती आणि सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्यासंबंधी सोशल मीडियावर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर हे प्रकरण पुढे आलं. त्यानंतर पत्रकार बंधुराज लोणे यांनी न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी निष्पक्षपणे चौकशी करणारी याचिका दाखल केली. त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.


निकाल धक्कादायक असून न्या. लोया यांच्या मृत्यूसंदर्भातील घटनाक्रम लक्षात घेता चौकशीला वाव होता. तसं आम्ही आमचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलं होतं. न्यायालयानं न्या. लोयासमवेत जे चार न्यायाधीश होते त्यांचं स्टेटमेन्ट ग्राह्य धरून हा निर्णय दिला असावा. आम्ही न्यायालयीन लढाई हरलोय पण हार मानलेली नाही. आता आम्ही जनतेच्या दरबारात न्याय मागणार असून त्यासाठी लवकरच आंदोलन सुरू करणार आहोत.
- बंधूराज लोणे, याचिकाकर्ते

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा