दाऊदला आणखी एक धक्का, तारिक परवीनला अटक

व्यापाऱ्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

दाऊदला आणखी एक धक्का, तारिक परवीनला अटक
SHARES


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील बांधकाम व्यवसायाची सूत्रे सांभाळणारा तारिक परवीन याला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मुंबईतून अटक केली. १९९८ मध्ये मुंब्रा येथे केबल वॉरमधून झालेल्या दोघांच्या हत्येप्रकरणी तारिकच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. धक्कादायक बाब म्हणजे मुंबई पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर तारिक ऑफिस थाटून त्याच्या कारवाया करत होता. एजाज लकडावालाला व्यापाऱ्यांची माहिती देऊन खंडणी मागायचा. अटकेमुळे दाऊदच्या आर्थिक साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे.
 १९९८ मध्ये मुंब्रा येथे तारिक परवीनने मोहम्मद इब्राहिमसोबत केबल व्यवसाय सुरू केला, मात्र धंद्यातील वैमनस्यातून तारिकने त्याच्या हस्तकांकरवी मोहम्मदवर अंदाधुंद गोळीबार केला. यात मोहम्मद आणि परवेज अन्सारी या दोघांचा मृत्यू झाला तर या गोळीबारात एका लहान मुलीच्या मांडीत गोळी घुसली. या घटनेनंतर तारिक पोलीस यंत्रणांना २० वर्षांपासून गुंगारा देत होता, मात्र त्याने मुंबईच्या जी. टी. हॉस्पिटलजवळ असलेल्या अशोका शॉपिंग सेंटरमध्ये काही दिवसांपूर्वी त्याच्या बांधकाम व्यवसायासाठी कार्यालय सुरू केले होते. एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. एजाज लकडावालाला अनेक व्यापाऱ्यांची माहिती देण्याचे काम तो करत होता. याबाबत माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्राक नोंदवण्यात आली होती. या तक्रारीनुसार त्याला रविवारी डोंगरीतून अटक केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा