नोकरीची ऑनलाईन ऑफर एका शिक्षिकेला पडली महागात

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचं सावट असल्यानं सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवलं जात आहे. शिक्षक-शिक्षिका ऑनलाइन क्लास घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पुर्ण करत आहेत.

नोकरीची ऑनलाईन ऑफर एका शिक्षिकेला पडली महागात
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचं सावट असल्यानं सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवलं जात आहे. शिक्षक-शिक्षिका ऑनलाइन क्लास घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पुर्ण करत आहेत. मात्र याच ऑनलाइन शिकवणीसाठी एका शिक्षिकेला तब्बल ८२ हजार रुपये मोजावे लागल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षिकेकडून पोलिसात तक्रार दाखल केली असून, बोरीवली पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

नोकरीच्या शोधात असलेल्या शिक्षिकेला बायज्यूस या ऑनलाइन क्लासेसच्या नावाने नोकरीसाठी फोन आला. पुढे याच नोकरीसाठी त्यांना ८२ हजार रुपये गमवावे लागले. बोरीवली परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेनं नोकरी डॉट कॉमवर नोकरीसाठी अर्ज केला होता. ३० ऑगस्ट रोजी मनीषा नावाच्या महिलेनं फोन करून 'बायज्यूस' या ऑनलाइन क्लासेसमध्ये शिक्षिका म्हणून निवड झाल्याचे सांगितले.

अर्ज पुढे पाठविण्यासाठी १९०० रुपये भरण्यास सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून पैसे भरले. पुढे नोकरीसाठी विविध कारणे देत ८२ हजार रुपये उकळले. आणखी पैशांची मागणी होताच त्यांना संशय आला. त्यांनी व्यवहार थांबवला. पैसे परत देण्यास सांगताच संबंधित महिला नॉट रिचेबल झाली. यात फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शनिवारी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा