अंधेरीत महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू


अंधेरीत महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू
SHARES

शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. पूनम सातपूते यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी अंधेरीत उघडकीस आली. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे.


कसा झाला मृत्यू?

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूनम सातपुते या अंधेरीच्या अंबोली येथील चार बंगला परिसरात एकट्याच रहात होत्या. स्त्रियांच्या संदर्भातील विविध आजारांवर उपचार करण्यासाठी त्या शहरातील नामांकित रुग्णालयांना भेट द्यायच्या. २२ डिसेंबर रोजी त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून असामान्य मुलांविषयी नागरिकांना शेवटचं मार्गदर्शन केलं होतं. मात्र मागील २ ते ३ दिवसांपासून त्या मानसिक तणावाखाली असल्याचं त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून सांगितलं जात आहे.


पोलीस तपास सुरू

गुरुवारी सकाळी पूनम यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. त्यावेळी शेजाऱ्यांनी पूनम यांचा दरवाजाची बेल वाजवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र पूनम घरातून कोणताही प्रतिसाद देत नव्हत्या. अखेर शेजाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देत बोलावून घेतले. त्यावेळी पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर पूनम यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा पोलिसांना दिसून आल्या नाहीत. पूनम यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात असलं, तरी पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा