मायलेकीच्या हत्येप्रकरणी आरोपी गजाआड

दहिसर - भाईंदरमध्ये झालेल्या मायलेकीच्या हत्या प्रकरणाचा छडा लागला आहे. महिलेच्या प्रियकरानेच मायलेकीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. विनायक एपूर असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी विनायकला दहिसरवरून अटक केली. महिला पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्याने आपण ठार मारल्याचे विनायकने पोलिसांना सांगितलं आहे.

28 जानेवारीला दीपिका संघवी (29) आणि हेतल (8 ) या मायलेकींचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. दीपिकाचे तिच्या नवऱ्यासोबत पटत नव्हते. त्यामुळे ती वेगळी रहात होती. दीपिका आणि आरोपी विनायक हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. त्यामुळे दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले. आरोपी विनायकचे नेहमी दीपिकाच्या घरी येणे-जाणे होते. दीपिकाची नोकरी गेल्यामुळे ती आरोपी विनायककडे पैसे मागत होती. याच पैशांवरुन दोघांमध्ये 25 जानेवारीला वाद झाला. त्यानंतर दीपिका झोपली असताना विनायकने तिच्यावर वार करुन तिची हत्या केली. हत्या करताना हेतल जागी झाली. आईची हत्या करत असल्याचं बघितलं. त्यामुळे 8 वर्षाच्या हेतललाही गळा दाबून विनायकने ठार मारलं आणि घटनास्थळावरुन फरार झाला.

Loading Comments