व्यापाऱ्याचे २५ लाख घेऊन नोकर पसार


व्यापाऱ्याचे २५ लाख घेऊन नोकर पसार
SHARES

दक्षिण मुंबईत एका प्रतिष्ठित व्यावसायिकाला त्याच्याच नोकराने २५ लाख रुपयांना गंडा घातला अाहे. या व्यावसायिकाचे २५ लाख रुपये घेऊन पसार झालेल्या नोकराचा अाता माता रमाबाई आंबेडकर ठाण्याचे पोलीस शोध घेत आहेत. इतकंच नव्हे तर या नोकराची माहिती देणाऱ्याला एक  लाख रुपयांचे बक्षीस व्यावसायिकानं जाहीर केल्यानं खासगी गुप्तहेरांपासून ते पोलिसांमध्ये आरोपीला पकडण्यासाठी चढाओढ सुरू आहे.
 


अशोक पटेल यांचे देशभरात अनेक व्यवसाय 

दि फोर्ट मर्चंन्ट वेल्फेअर असोशिएशनचे अध्यक्ष असलेले तक्रारदार अशोक पटेल यांचे मुंबईत विविध व्यवसाय आहेत. त्यांच्या व्यवसायाचा कार्यविस्तार फक्त मुंबईतच नव्हे तर देशभर पसरलेला अाहे. त्यामुळेच दर महिन्याला या व्यवसायातून मिळणारा नफा गोळा करण्यासाठी  पटेल यांनी आरोपी प्रकाशकुमार उर्फ पूनाराम ललराम चौधरी यांची नियुक्ती केली होती. मूळचा राजस्थानच्या बाली परिसरातून आलेला प्रकाशकुमार गेल्या १५ वर्षांपासून पटेल यांच्याकडे निष्ठेने काम करत होता. 


 
 २५ लाख रुपये अाणण्यासाठी हैदराबादला रवाना

पटेल यांच्या मालकीचे  कफ परेडमध्ये किंग प्लाजा सुपरमार्केट, व्हिवा विडा रेडिमेट गार्मेंट, पटेल वाईन्स शाॅप, किंग प्लाझा मेडिकल शाँप, किंग प्लाझा स्टेशनरी शाॅप, शक्ती जनरल स्टोअर्स सुपरमार्केट आणि अन्य विविध व्यवसाय भारतात आहेत. यातून मिळणारे  उत्पन्न घेण्याचे काम प्रकाशकुमार करायचा. अलीकडेच पटेल यांनी त्याला हैदराबाद इथं व्यवसायातून मिळालेले २५ लाख रुपयांचे उत्पन्न घेण्यासाठी पाठवले होते. हे पैसे घेऊन सोमवारी प्रकाशकुमार मुंबईला येण्यासाठी निघाला. 


 
मुंबईतून झाला पसार 

मुंबईत दाखल झाल्यानंतर प्रकाशकुमारने आपण आपल्या खोलीवर जाऊन अंघोळ करून येतो अाणि नंतर पैसे देताे, असे फोनवरून पटेल यांना सांगितले. दुपार झाली तरी प्रकाशकुमार घरी न आल्यामुळे पटेल यांनी त्याला फोन लावला. मात्र त्याचे दोन्ही फोन बंद येत होते. मुंबईत  प्रकाश कुठे राहतो, याबाबत पटेल यांना फारशा माहिती नव्हती. तरी पटेल यांनी रात्रीपर्यंत वाट पाहिली. तरीही प्रकाशकुमारचा काहीच पत्ता नव्हता. अखेर पटेल यांनी बुधवारी प्रकाशकुमारविरोधात तक्रार नोंदवली. 


 
प्रकाशकुमारची नियत फिरली 

पटेल यांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय असल्याने घरात कायम पैसा खेळत असायचा. हे पाहून प्रामाणिक असलेल्या प्रकाशकुमारचीही नियत फिरली. त्यामुळेच प्रकाशने ही चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. प्रकाशकुमार कुठे आढळल्यास किंवा त्याची माहिती कुणी दिल्यास त्याला  १ लाख रुपये बक्षीस देण्याचे आवाहन पटेल यांनी केले आहे. बक्षिसाच्या लालसेपोटी प्रकाशकुमारला पकडण्यासाठी पोलीस पथकांमध्ये चढाओढ लागल्याचे समजते.


हेही वाचा- 

नायगावच्या महिला पोलिसाची आत्महत्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा