विद्यार्थीनीच्या विनयभंगप्रकरणी शिक्षकास अटक


विद्यार्थीनीच्या विनयभंगप्रकरणी शिक्षकास अटक
SHARES

महाविद्यालयीन तरुणीला परीक्षेतील गुण वाढवून देण्याच्या नावाखाली तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाला घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. या घटनेमुळे कॉलेज परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.


मार्क वाढवण्याचं दाखवलं अामीष

घाटकोपर पंतनगर परिसरातील एका ज्युनिअर कॉलेजमध्ये पीडित तरुणी अकरावी इयत्तेत शिक्षण घेत होती. शनिवारी अकाऊंट्सचा पेपर असल्यानं ती परीक्षेसाठी महाविद्यालयात गेली होती. परीक्षेदरम्यान एका शिक्षकानं गुण वाढवून देतो, असं अामीष दाखवून शिक्षकाने तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. घडलेला सर्व प्रकार या विद्यार्थिनीने त्वरीत इतर शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिला. या घटनेची गंभीर दखल घेत संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी पंतनगर पोलिस ठाण्यात संबधित शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवला. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी त्या शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा