बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी, शिवसेना उपशाखाप्रमुखाला अटक


बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी, शिवसेना उपशाखाप्रमुखाला अटक
SHARES

मंदिराचा ताबा मिळवण्यासाठी बोरिवलीतील शिवसेना उपशाखाप्रमुखाने बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी विजय गाठाळ (३५) याला कस्तुरबा पोलिसांनी अटक केली आहे.


मंदिराच्या चावीवरून वाद

बोरिवली पूर्वेकडील देवलापाडा येथे विजय गाठाळ राहत अाहे. परिसरातील मुदलीयार चौधरी हे परिसरातील साईबाबा मंदिराची देखभाल करतात. तक्रारदार प्रेमचंद्र मोर्या (५३) यांचा जिलेबी विक्रीचा व्यवसाय असून मंदिरात साफसफाईचे काम ते करतात. तक्रारीनुसार, गाठाळ मंदिरावर वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होता. त्यातून त्याचे चौधरीसोबत वाद होते. या मंदिराची चावी मोर्याकडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तो रात्री एकच्या सुमारास गणेश नगर येथील घरी गेला. त्याने मोर्या यांच्याकडे मंदिराची चावी मागितली. त्यांनी नकार दिल्याने गाठाळने देशी कट्टा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. मोर्याने याप्रकरणी कस्तुरबामार्ग पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. 




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा