नाशिकमार्गे मुंबईत ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या तिघांना अटक

नाशिकमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या विशेष कारवाईनंतर मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तिघांना अटक केली आहे. या तिघांच्या चौकशीनंतर मुंबईतील अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्या दोन बड्या हस्तकांची नावं देखील पुढे आली आहेत.

नाशिकमार्गे मुंबईत ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या तिघांना अटक
SHARES

मुंबईत ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांची पाळंमुळं उखडण्यात मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आलं आहे. नाशिकमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या विशेष कारवाईनंतर मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तिघांना अटक केली आहे. या तिघांच्या चौकशीनंतर मुंबईतील अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्या दोन बड्या हस्तकांची नावं देखील पुढे आली आहेत.


संपूर्ण प्रकार

मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा येथून बुधवारी कारमधून आरोपी रणजित मोरे, पंकज दुंडे, नितीन माळशेदे हे 44 लाखांचं ड्रग्ज घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या तिघांना अटक केली. त्यावेळी तिघांच्या गाडीत 265 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आलं. या ड्रग्जची बाजारात किंमत 5 लाख रुपये इतकी आहे.


सापळा रचून कारवाई

याप्रकरणी गुन्हे शाखेने या तिघांविरोधात इंदीरानंगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली. या तिघांच्या चौकशीत त्यांना हे अंमली पदार्थ मुंबईच्या अंधेरी परिसरातील लोखंडवालामध्ये राहणाऱ्या नदीन सलीम सौरठीया आणि सैफउल्ला फारूख शेख यांनी दिल्याचं सांगितलं. त्यानुसार अंधेरीच्या लोखंडवालामध्ये सापळा रचून या दोघांना अटक केली आहे. या अंमली पदार्थाच्या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा