• चैत्यभूमीवर कडक बंदोबस्त
SHARE

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर दादर येथील चैत्यभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात अाला अाहे. अोखी वादळाच्या भीतीमुळे मुंबई पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात अाल्या अाहेत. सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार कायम असल्यामुळे अांबेडकरी अनुयायांची योग्य ती सोय करण्यात अाल्याची माहिती दादर विभागाचे सहाय्यक पोलीस अायुक्त सुनील देशमुख यांनी दिली अाहे.


संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज

राज्यातून तसेच देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली अाहे. 1 अतिरिक्त पोलीस अायुक्त, 5 पोलीस उपायुक्त, 6 सहाय्यक पोलीस अायुक्त, 100 अधिकारी, 1 हजार पोलीस कर्मचारी असा ताफा सज्ज ठेवण्यात अाला अाहे. त्याचबरोबर बाँम्बशोधक पथक, श्वानपथक, दंगलविरोधी पथक, राज्य राखीव दलाची पथके तैनात करण्यात अाली अाहेत.नो फ्लाईंग झोन


६ डिसेंबरला चैत्यभूमीवर उसळणारा भीमसागर बघता हा संपूर्ण परिसर 'नो फ्लाईंग झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. यावेळी या परिसरातून विमानासह ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमधून करण्यात येणाऱ्या पुष्पवृष्टीसाठी मात्र नियम शिथिल करण्यात अाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या