नायगाव, वरळी पाठोपाठ आरएकिडवाई पोलिस वसाहत ही सील, API अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा


नायगाव, वरळी पाठोपाठ आरएकिडवाई पोलिस वसाहत ही सील, API अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा
SHARES
देशात कोरोनाने सध्या हाहाकार माजवला असताना, कोरोना बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. या कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन एकवटलं असताना, या संसर्ग जन्य रोगाची लागन खाकीवर्दीतील तब्बल 7 जणांना झाली असल्याचे पुढे आले होते. माञ दिवसेंदिवस पोलिस खात्यात कोरोनाने बाधित झालेल्यांचा आकडा वाढतच आहे. नुकतीच आर.ए.किडवाई पोलिस वसाहतीत एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. पालिकेने तो अधिकारी रहात असलेली इमारक सील केली आहे. विशेष म्हणजे याच वसाहतीच्या तळमजल्याला आर.ए.किडवाई मार्ग पोलिस ठाणे आहे.

आर.ए.किवडाई मार्ग पोलिस वसाहतीत राहणारा हा सहाय्यक पोलिस निरीक्षक एसबी वन मध्ये कार्यरत होता. त्याला दोन दिवसांपासून सर्दी व ताप येत होता त्यामुळे त्यांनी  दोन दिवसांपूर्वी के.ई.एम हॉस्पिटल येथे जाऊन कोरोना चाचणी केली असता. सदरची चाचणी ही पॉझिटिव आल. त्या अधिकाऱ्याला पुढील उपचारासाठी अंधेरीच्या सेवन हिल रुग्णालयात नेले आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यासोबत खात्यातीलच दोन पोलिस उपनिरीक्षक वास्तव्याला होते. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी गुरूवारी केली जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. खाकीवर्दीत या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांच्या 15 वसाहतींकडे शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.


राज्यभरात आतापर्यंत पोलिस खात्यातील 7 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. त्या सात जणांच्या संपर्कातील इतर 47 जणांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
यात दोन अधिकाऱ्यांचा समावेश असून एक मुंबईचा तर दुसरा अधिकारी ठाण्याचा आहे. तर पाच पोलिस शिपाईक कोरोना बाधित असून त्यातील एक रेल्वे पोलिस दलातील आहे. तर विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 47 जणांमध्ये 5 अधिकाऱ्यांचा समावेश असून 42 पोलिस शिपाई आहेत. यातील बहुतांश पोलिस मुंबईतल्या विविध पोलिस वसाहतीत वास्तव्याला आहे. त्यामुळेच मुंबईतील 15 पोलीस वसाहतींवर विशेष लक्ष केंद्रीय करण्यात आले  आहे. यातील 3 पोलीस वसाहती सील करण्यात आल्या आहेत. विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलेल्या वसाहतींमध्ये 8 वसाहती या पोलीस कर्मचा-यांच्या आहेत. तर4 वसाहती या पोलीस अधिका-यांच्या आहेत. अशा 12 वसाहतींवर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. अशा वसाहतीत एक दिवसाआड वैद्यकीय पथक जाऊन येथील अधिकारी-कर्मचा-यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी करीत आहेत. तर ज्यांना अशा प्रकारची लक्षणे वाटत आहेत, त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात येत आहेत. तसेच सर्व पोलीस वसाहतींचे गेट बंद केले असुन, येणा-या जाणा-यांची कसुन तपासणी सुरु आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा