तब्बल 9 दिवसांनी सापडली चिमुरडी

 Mumbai
तब्बल 9 दिवसांनी सापडली चिमुरडी

वांद्रे - बेहरामपाडा येथील अडीच वर्षांची चिमूरडी तब्बल 9 दिवसांनतर सापडली. शुक्रवारी पोलिसांनी मुलीला माझ्याकडे स्वाधीन केल्याचे मुलीची आई साजिदा शेख यांनी सांगितले आहे. सायनमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाकडे एक महिला या मुलीला सोडून गेली होती. पुन्हा ती महिला आलीच नसल्याने या कुटुंबाने अखेर या मुलीला निर्मलनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही मुलगी 9 फेब्रुवारीला गायब झाली होती. दरम्यान सीसीटीव्हीमध्ये अपहरणाचे दृश्य कैद झालं होतं. दरम्यान आरोपी महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.

Loading Comments