उल्हासनगरमध्ये बंदुकीचा थरार! धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले...

Ulhasnagar, Mumbai  -  

उल्हासनगरचे स्थानिक व्यापारी महादेव सोमानी यांना बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी सोमानी यांच्या गळ्यातील 48 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लुटून पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात चोरी आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यांची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे.

Loading Comments