गोरेगावमध्ये भरदिवसा तृतीयपंथीयाची हत्या

सुरेश पुजारी हे गोरेगावमधील तृतीयपंथ समुदायाचे प्रमुख होते. बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मालामधील रुमानिया हॉटेलजवळून ते जात होते.

गोरेगावमध्ये भरदिवसा तृतीयपंथीयाची हत्या
SHARES

गोरेगावमध्ये भर दिवसा एका तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी बांगूरनगरमध्ये ही घटना घडली आहे. सुरेश पुजारी उर्फ सूर्या (३८) असं या तृतीयपंथीयाचं नाव आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.   

सुरेश पुजारी हे गोरेगावमधील तृतीयपंथ समुदायाचे प्रमुख होते. बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मालामधील रुमानिया हॉटेलजवळून ते जात होते. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, हल्ल्यानंतर सूर्या यांनी आरोपींसोबत दोन हात करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका आरोपीने चाकू काढून त्यांच्या मानेवर वार केला. सूर्या मदतीसाठी ओरडत असल्याने तिथं उपस्थित लोकांनी धाव घेतली. त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला.

हल्ल्यात सूर्या गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी रुग्णालयात नेलं. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत. सूर्या यांची सोन्याची चेन आणि पाकिट यांना आरोपींनी हात लावला नसल्याने हत्या हाच मुख्य उद्धेश होता असं प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. ही पूर्वनियोजित हत्या असावी. तसंच तीन मारेकरी होते इतकीच माहिती मिळाली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा