TRP scam : नंबर १ वर येण्यासाठी पार्थ दासगुप्ताला अर्णब गोस्वामीने दिले लाखो रुपये ?


TRP scam : नंबर १ वर येण्यासाठी पार्थ दासगुप्ताला अर्णब गोस्वामीने दिले लाखो रुपये ?
SHARES

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) पार्थ दासगुप्ता याला रिपब्लिक टीव्हेचे अर्णब गोस्वामी यांनी लाखो रुपये दिल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एक महागडे घड्याळ व सुमारे साडे तीन किलोचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

हेही वाचाः- मी जर तोंड उघडलं तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना देशाबाहेर जावं लागेल - संजय राऊत

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकततीच बीएसआरसीचे माजी सीईओ दासगुप्ता यांना अटक केली होती. ही  याप्रकरणी १५ आरोपींना अटक होती. आरोपी पार्थ दासगुप्ता हे बीएआरसी या कंपनीत मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत असताना त्याने रिपब्लीक भारत हिंदी न्यूज चॅनेल व रिपब्लीक टीव्ही इंग्रजी न्यूज या चॅनल्सचे टीआरपीमध्ये अर्णब गोस्वामी तसेच अन्य संबंधित आरोपींशी अन्यायाचे संगनमत करून गैरकायदेशिर मार्गाने फेरफार करून त्यांची टीआरपी वाढविली व त्याबदल्यात नमूद टीव्ही चॅनल्सचे अर्णब गोस्वामी यांनी आरोपी पार्थ दासगुप्ता यास वेळोवेळी लाखो रूपये दिले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या पैशातून पार्थ दासगुप्ता याने काही किंमती वस्तू व दागिने विकत घेतले असून ते राहते घरी होते.  याबाबत चौकशीत दासगुप्ता यांनी सांगितल्यानंत त्यांच्या  घरातून १ मनगटी घडयाळ व  सिल्वर रंगाच्या धातुचे ३ किलो ३०० ग्रॅम वजनाचे  दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. न्यायालयापुढे सादर केलेल्या अहवालातही पोलिसांनी ही नमुद केली आहे.

हेही वाचाः- ईडीच्या कार्यालावर शिवसैनिकांनी लावलं भाजपा प्रदेश कार्यालयाचे पोस्टर

बीएआरसी ही संस्था भारतीय माहीत व प्रसारण मंत्रालय (एमआयबी) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( ट्राय) यांच्या अधिपत्याखाली काम करते.  या संस्थेने संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी जवळपास३ हजार बोरोमिटर्स बसवले असून त्याद्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या पाहिलेल्या कार्यक्रमांवर निगराणी ठेवली जाते व त्याद्वारे विविध चॅनेल्सना रेटींग दिले जाते. बीएआरसीने दिलेल्या रेटिंग्ज नुसार जाहिरातदार जाहिरात प्रसारित करणार्यांना पैसे देतात. टीआरपीमध्ये फेरफार करून फसवणूक केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष केलेल्या चॅनेल्सना होतो आणि अशा प्रकारे फेरफार करून टीआरपी वाढवल्या मुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याप्रकरणी तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ४०९, ४२०, ४६५, ४६८, ४०६, १२०(ब),२०१, २०४, २१२ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल होता. आतापर्यंत याप्रकरणी १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने नुकतीच आरोपपत्र दाखल केले होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा