वकिलाचा मोबाइल चोरणारे अटकेत


वकिलाचा मोबाइल चोरणारे अटकेत
SHARES

पूर्ववैमनस्यातून वकिलाला मारहाण करत त्याचा मोबाइल लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी चेंबूरच्या टिळक नगर परिसरात घडली होती. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना तत्काळ अटक केली. वसीम शेख (24) आणि दशरथ वाकोळे (28) अशी त्यांची नावे आहेत. तर सलिम शेख असे तक्रारदार वकिलाचे नाव आहे.

टिळक नगर परिसरात राहणारे सलिम शेख यांचा चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्गावर राहणाऱ्या वसीम आणि दशरथ या दोघांसोबत अनेक दिवसांपासून वाद होता. गुरूवारी दुपारच्या सुमारास काही कारणांवरून या तिघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून आरोपींनी सलिम यांना मारहाण करत त्यांच्याकडील 12 हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन चोरून पळ काढला. त्यानंतर सलिम यांनी टिळक नगर पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा