गोवंडीत नाल्यात पडून दोघांचा मृत्यू


गोवंडीत नाल्यात पडून दोघांचा मृत्यू
SHARES

नाल्यात पडून २ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी गोवंडीत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.


खेळताना पडले नाल्यात?

ही मुले गोवंडी नाल्याशेजारी असलेल्या वस्तीत राहतात. सकाळच्या सुमारास खेळत असताना ही मुले नाल्यात पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दोन्ही अल्पवयीन मुलांचं शव मिळालं आहे. या दोघांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या मुलांची ओळख अद्याप पटलेली नाही. यातील एक मुलाचं वय १२ तर दूसऱ्याचं वय ९ असल्याचं सांगितलं जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा