मुंबईत अल्पवयीन मुलींवर बलात्कार

  Mumbai
  मुंबईत अल्पवयीन मुलींवर बलात्कार
  मुंबई  -  

  मुंबईत अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. माहिमच्या नयानगर परिसरात शुक्रवारी सात वर्षांच्या मुलीवर 15 वर्षाच्या मुलानं बलात्कार केला. मुलगी माचिस आणायला दुकानात जात असताना तिच्या शेजाऱ्यानं तिला जबरदस्ती स्वत:च्या घरात खेचलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

  तर आरोपीच्या आईनं आपला मुलगा निर्दोष असल्याचं म्हणत सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. मुलीची आई खोटं बोलत आहे, असा आरोपही आरोपीच्या आईनं केला आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

  तर दुसरी घटना भायखळ्यात घडलीय. एका अल्पवयीन मुलीनं 50 वर्षांच्या एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला आहे. या मुलीचं घर तुटलं होतं. त्यामुळे मुलीला आरोपीनं आपल्या घरी आसरा दिला. पण परिस्थितीचा फायदा घेत अनेक वेळा आरोपीनं आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीनं केलाय. यामुळे मुलगी गर्भवती झाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.