एकाच दिवसात कुरारमध्ये दोन आत्महत्या

  Kurar Village
  एकाच दिवसात कुरारमध्ये दोन आत्महत्या
  मुंबई  -  

  कुरार - पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दोघांनी आत्महत्या केल्याची घटना कुरारमध्ये घडली. यामध्ये एक जण तीन मुलांचा पिता असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. तर यामधील दुसऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो 12 वी चे शिक्षण घेत होता. तो क्रांतीनगर परिसरातला रहिवासी होता. घरात वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून त्याने ही आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. तर याबाबत कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एलटी वैमाने यांचं म्हणणं आहे की, विद्यार्थ्याच्या घरात वारंवार होणाऱ्या भांडणामुळे कंटाळून त्याने हे पाऊल उचलले. मात्र या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.