सुशांत प्रकरणात पोलिसांच्या बदनामीसाठी ‘बॉट अप्लिकेशन’चा वापर

मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी ‘बॉट अप्लिकेशन’चा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी दिली आहे.

सुशांत प्रकरणात पोलिसांच्या बदनामीसाठी ‘बॉट अप्लिकेशन’चा वापर
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात काही मिडिया चॅनलने जाणून बुजून पोलिसांची बदनामी केल्याचा आऱोप खुद्द पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी केला होता. या प्रकरणात आता १ लाखाहून अधिक फेक अकाऊन्ट मुंबई पोलिसांनी शोधून काढले आहेत. तर मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी ‘बॉट अप्लिकेशन’चा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी दिली आहे.

 हेही वाचाः- ऑक्सफर्ड विद्यापीठाकडूनही धारावी पॅटर्नचं कौतुक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर चौफेर टीका झाली होती. सोशल मीडियावरूनही अनेक गोष्टी रंगवून सांगितल्या जात होत्या. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीचं मोठं षडयंत्र रचलं गेल्याचं आता पुढे आले आहे. याप्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी तब्बल ८० हजार फेक अकाऊन्ट बनवण्यात आली असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. पण आता या तपासणीत एक लाखांहून अधिक खात्यांचा वापर झाल्याचे पुढील तपासात निष्पन्न झाले आहे. त्यासाठी सात बॉट अप्लिकेशनचा वापर करण्यात आला असून एका बॉट अॅप्लिकेशनच्या सहाय्याने सहा ते सात हजार सोशल मीडिया अकाउंट हाताळता येऊ शकतात. तसेच काही आयपी अँडरेसच्या माध्यमातून हे ‘बॉट अप्लिकेशन’ हाताळले जात असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- पुछता है भारत! अर्णब गोस्वामीला अटक कधी?

काही प्रसिद्धी माध्यमांनीही मुंबई पोलिसांवर विरोधात एक मोहीम चालवली. १६ जून सुशांतचा कुटुंबियांची विधानामध्ये देखील त्यांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं पण कुटुंबातील सदस्य चौकशीसाठी आले नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. आता या प्रकरणी सायबर पोलिसात फेक अकाऊन्ट उघडून बदनामी केल्या प्रकरणी आणि चुकीची माहीती सोशल मिडियावर टाकून दिशाभूल केल्याप्रकऱणी दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याचे पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा