Advertisement

पुछता है भारत! अर्णब गोस्वामीला अटक कधी?

खोटं टीआरपी रॅकेट चालवणारा रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचा संपादक अर्णब गोस्वामीला अटक कधी करणार? अर्णब को जेल कब होगी ? पुछता है भारत! असा सवाल शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केला आहे.

पुछता है भारत! अर्णब गोस्वामीला अटक कधी?
SHARES

खोटं टीआरपी रॅकेट चालवणारा रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचा संपादक अर्णब गोस्वामीला अटक कधी करणार? अर्णब को जेल कब होगी ? पुछता है भारत! असा सवाल शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केला आहे. 

यासंदर्भात बोलताना प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून टीआरपी घोटाळा उघडकीस आणला आहे. या टीआरपी घोटाळ्यामध्ये पहिलं नाव हे फक्त मराठी, दुसरं नाव हे बाॅक्स टीव्ही आणि तिसरं नाव रिपब्लिक टीव्हीचे मालक, संस्थापक आणि चालक अर्णब गोस्वामी यांचं आहे. फक्त मराठी आणि बाॅक्स टीव्हीच्या चालकांना पोलिसांनी अटक केली आहे. परंतु अजूनपर्यंत अर्णब गोस्वामी यांना अटक केलेली नाही. त्यामुळे अर्णब गोस्वामींना कधी अटक करणार? या टीआरपी घोटाळ्यापाठीमागचा खरा सूत्रधार अर्णब गोस्वामी आहे. सध्या रिपब्लिक टीव्ही देशात टीआरपीत एक नंबरला असल्याने त्याच्याच माध्यमातून हा टीआरपी घोटाळा झाल्याचे पोलिसांकडे पुरावे आहेत. त्यामुळे अर्णब गोस्वामीला अटक कधी होणार? असा प्रश्न मी विचारत आहे.

दरम्यान, रिपब्लिक भारत बरोबरच फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस हे दोन चॅनेल्ससुद्धा फेक टीआरपी प्रकरणात अडचणीत आले आहेत. फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस चॅनेलच्या मालकांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. मात्र रिपब्लिक भारत न्यूज चॅनेलच्या मॅनेजमेंटची चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं आहे. मुंबईतील १८०० घरांमध्ये पैसे देऊन हे चॅनेल्स चालू ठेवावेत, अस सांगण्यात आलं होतं. त्यानुसार लोकांना महिन्याला ४०० ते ५०० रुपये देऊन टीआरपी वाढवण्यासाठी हातभार लावण्यात आला, असा खुलासा देखील पोलिसांनी केला आहे. हे रॅकेट फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे.


हेही वाचा -

फेक टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश, दोन चॅनलच्या मालकांना अटक

सुशांत प्रकरणात : महाराष्ट्राची जाणून बुजून बदनामी, सायबर पोलिसात गुन्हे दाखल


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा