वडाळ्यात मध्यरात्री दरोडा, सकाळी आरोपी अटकेत

 wadala
वडाळ्यात मध्यरात्री दरोडा, सकाळी आरोपी अटकेत

वडाळा - वाढत्या घरफोडीमुळे अँटॉप हिलच्या संगमनगर परिसरातले रहिवासी त्रस्त असताना अवघ्या काही तासांतच दोन सराईत चोरट्यांना पकडण्यात वडाळा टीटी पोलिसांना मंगळवारी यश आले आहे.

कोयला गल्लीत राहणाऱ्या दोन अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री एका बंद घराचे टाळे तोडून 4 लाख 36 हजाराची रोकड लांबवली होती. घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पंचनामा सुरू असताना शेजारी राहणारे विशाल रवींद्र केवट (19), गोकुळ उर्फ मयूर बबन पोखरकर (23) यांची संशयास्पद हालचाल सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ते पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केली असता घरफोडीचे गूढ उकलले. त्यांच्या घरातून 4 लाख 26 हजाराची रोकड सापडली.

Loading Comments