गावठी कट्ट्यासह एकाला अटक

 Pali Hill
गावठी कट्ट्यासह एकाला अटक

चेंबुर - परवाना नसताना गावठी कट्टा सोबत ठेवणाऱ्या एका आरोपीला बुधवारी आरसीएफ पोलिसांनी अटक केली. आनंद वर्मा (३५) असे या आरोपीचे नाव असून तो चेंबुरच्या पांजरापोळ येथील राहणारा आहे. या आरोपीकडे अशा प्रकारचा शस्त्रसाठा असल्याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एन. चांदगुडे यांना मिळाली. त्यानुसार बुधवारी रात्री सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे गावठी कट्टा आणि एक काडतुस हस्तगत करण्यात आला आहे. त्याने हा गावठी कट्टा कुठून आणला याबाबत आरसीएफ पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments