एमडी ड्रग्जची तस्करी करणा-या महिलेला अटक


एमडी ड्रग्जची तस्करी करणा-या महिलेला अटक
SHARES

अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने वांद्रे लिंकिंग रोड येथून एका महिलेला मेफेड्रॉनस अटक केल्यानंतर याप्रकरणी आतापर्यंत ७६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नजमा अहमद शेख असे या महिलेचे नाव असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 नजमा माहीमच्या जनता सेवक सोसायटीमध्ये राहते. घाटकोपर युनिटच्या पोलीस निरीक्षक लता सुतार याना ही महिला एमडी विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती. यावरून घाटकोपर युनिटने सापळा रचून तिला अटक केली. तिच्युकडून त्या ठिकाणी १०० ग्रॅम एमडी (किंमत १० लाख ), रोख रक्कम २० हजार रुपये देखील मिळाली. तसेच पोलिसांनी तिच्या कुर्ला येथील घरी झडती घेतली असता त्यांना २ किलो ७०० ग्रॅम चरस ज्याची किंमत 54लाख इतकी असून रोख रक्कम ९ लाख ४५ हजार रुपये सापडले आहेत.

 या महिलेकडून पोलिसांना एकूण ७६ लाख ६५ हजार रुपयांचे ड्रग्ज आणि रोख रक्कम मुद्देमाल हाती लागला आहे. ही महिला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री आणि पुरवठा करीत होती. तिने इतक्या मोठ्या प्रमाणत ड्रग्ज कुठून आणले होते? ते कोणाला विक्री करीत होती? याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा