मोटरमनच्या प्रसंगावधनामूळे वाचले महिलेचे प्राण, टिळक नगर स्थानकातील घटना


मोटरमनच्या प्रसंगावधनामूळे वाचले महिलेचे प्राण, टिळक नगर स्थानकातील घटना
SHARES

हार्बर मार्गावरील टिळक नगर स्थानकात एका महिलेने चालत्या ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी, २४ वर्षीय शारदा फुलवते या महिलेला आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा सगळा प्रकार टिळक नगर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

२१ जानेवारीला टिळक नगर रेल्वे स्थानकावर सकाळी ११.३० वाजता आलेल्या शारदा फुलवते या महिलेने प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या रेल्वेखाली येण्याचा प्रयत्न केला. तीने अचानक प्लॅटफॉर्मवरून ट्रॅकवर उडी घेतली.


का केला आत्महत्येचा प्रयत्न?

या गोष्टीची दखल घेत मोटरमनने तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावला आणि लोकलचा वेग कमी झाला. ही घटना आरपीएफ जवानाने पाहिली आणि क्षणाचाही विलंब न करता मोटरमनला गाडी थांबवण्याचा इशारा करत त्या महिलेला मोठ्यानं ओरडत बाजूला होण्यास सांगितलं. त्यानंतर आरपीएफ पोलिसांनी शारदा फुलवते हीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी तिच्याकडे विचारणा केली असता सासरच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं. यासंदर्भात शारदा हीच्या विरोधात रेल्वे कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचं आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा