नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

Kandivali East
नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
See all
मुंबई  -  

कांदिवलीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रोएस्टर या नराधमाला अटक केली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, समतानगरमध्ये राहणारी पीडित महिला आणि आरोपी एकमेकांना आधीपासून ओळखत होते. पीडितेला नोकरीची आवश्यकता असल्याने तिने त्याला तिच्यासाठी नोकरी शोधण्यास सांगितले होते. याचाच फायदा घेत हा नराधम तिला 8 जूनला काम देण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला आणि तिच्यावर त्याने जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, या प्रकरणी पीडित महिलेने समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करताच या नराधमाचे बिंग फुटले. महिलेचे लैंगिक शोषण करून हा आरोपी फरार झाला. मात्र, पोलिसांच्या पथकाने त्याला पुण्यातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 16 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.