Advertisement

‘हेलो चार्ली’ चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

अमेझॉन प्राइम व्हिडिओनं आपल्या आगामी कौटुंबिक मनोरंजन ‘हेलो चार्ली’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘हेलो चार्ली’ चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित
SHARES

अमेझॉन प्राइम व्हिडिओनं आपल्या आगामी कौटुंबिक मनोरंजन ‘हेलो चार्ली’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या विनोदी चित्रपटात जैकी श्रॉफ, आदर जैन, एलनाज नौरोजी आणि राजपाल यादव यांच्यासोबत पदार्पण करणारी अभिनेत्री श्लोका पंडित मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

पंकज सारस्वत यांच्याद्वारे दिग्दर्शित आणि एक्सेल इंटरटेनमेंटचे निर्माते रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे निर्मित ‘हेलो चार्ली’चा ट्रेलर एका ऍडव्हेंचर कॉमेडीच्या अनोख्या दुनियेत आपल्याला घेऊन जातो.

 ज्यामध्ये गोरिल्ला टोटो आणि भोळा-भाला चार्ली (आदर जैन) यांची मजेदार केमिस्ट्री पहायला मिळेल. हा चित्रपट आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवतो. एक करोड़पति व्यक्तीच्या पलायन नाट्यावरून गोंधळ निर्माण होतो.

 

या ट्रेलरविषयी अभिनेता जैकी श्रॉफ म्हणाले की, “ कोणत्याही विनोदी चित्रपटात काम करताना मला नेहमीच खूप मजा येते. मात्र तुम्हाला हे कळायला हवं की, या जॉनरचा चित्रपट करणं हे खाण्याचं काम नाही. इतक्या कठीण चित्रपटाला इतक्या सोपेपणानं बनवण्याचं श्रेय दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांच्या शानदार टीमला जातं आणि हे नमूद करतानाच, अशा प्रतिभाशाली कलाकार आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत ‘हेलो चार्ली’मध्ये काम करण्याचा अनुभव खरोखर मजेदार होता. आम्हाला आनंद आहे की चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ग्लोबल रिलीज़ होणार आहे.”

ट्रेलरचे अनावरण होताना अभिनेता आदर जैननं मोठ्या उत्साहानं सांगितलं की, “मी या गोष्टीमुळे प्रचंड रोमांचित झालो आहे की, आमच्या चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. अखेरीस प्रेक्षकांना ‘हेलो चार्ली’च्या अनोख्या जगाची झलक पहायला मिळणार आहे. मी जैकी सर, फरहान सर, रितेश सर, पंकज सर, श्लोका आणि टीमच्या बाकी सदस्यांसोबत काम करताना धमाल वेळ घालवला आहे. आम्ही हा चित्रपट पूर्ण मनानं आणि प्रामाणिकपणानं बनवला आहे."

ट्रेलर वर बोलताना नवोदित अभिनेत्री श्लोका पंडित म्हणाली की, “संक्षेपानं सांगायचं झालं तर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही आहे. हा माझा पहिलाच सिनेमा असून पहिल्याच चित्रपटात जैकी सर, आदर आणि राजपाल सरांसोबत काम करताना मी स्वत:ला सौभाग्यशाली आणि नशीबवान मानते. एक्सेल एंटरटेनमेंट आणि आमचे दिग्दर्शक पंकज सारस्वत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शिकवणारा ठरला आहे."

भारतासोबतच अन्य २४० देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम सदस्य ९ एप्रिल, २०२१ ला या चित्रपटाचा ग्लोबल प्रीमियर पाहू शकतील.



हेही वाचा

67th National Film Awards - मराठी चित्रपटांचा देखील बोलबाला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा